नेत्र भरून मजकडे पाही रे । ध्यास लागली आस म्हणुनि त्रास नको करूं, जहाले गाय रे ॥धृ०॥
राजसवाणे गोड बोलणें । चातक पक्षापरी येइ रे ॥१॥
कंठुं कुणाच्या बळें मी कळेना । जीव जळुनिया होती लाही रे ॥२॥
माळसी (?) करी का परद्वारीं । मागेन तें मज दान देईं रे ॥३॥
अमृतवेळा लावा जिव्हाळा । रामा म्हणे पहा आपली सोई रे ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.