मी उभी अंगणीं पाहुं राजसा गृहिं चला सख्या सजणा ॥धृ०॥

आज कांहिं चुकले सेवेला, पदरीं घाला, सन्मुख उभी राहते । संकेत मनाचा केला, घरीं नसेल तुझी वाट पाहाते । जिव जळुन रक्षा झाला, पाहुन तुजला विषयाचें आलें भरतें । प्रीतींत नका वितुष्ट पाडूं, हात किति जोडूं ? लोटला एक महिना ॥१॥

तूं नको अम्हांसी साळू थाथर जाळू, किती सांगावें तुजसी ? । तुजपेक्षां घरची कांता गुणवंता आहे नादर सुकवासी । तुझी आपली संगत घडली, प्रीत जडली, नेशिला रंगमहालासी । होइल जनामधिं ठावें फिरुन काय जाते तूं चंचळ मृगनयना ॥२॥

मी आशावंत स्वामीची तुमच्या करची, आधीं लाविलीस माया । ममतेचा घालुनि फासा राजहांवसा कशी घेतली क्रिया ? । भुलले मी तुमच्या स्वरुपा ज्ञानदीपा, कर मजवरतीं छाया । तुम्हि कुटुंबवत्सल होता असे कळतां कां लाविलेस ध्याना ? ॥३॥

आली माया आत, करुनी इसकील, धरुनी रंगमहालामधिं नेली । जाइजुई मालती मरवा पाच हिरवा, शेज पलंगावर केली । नाना परि विलास करती जडण मोतिहारी म्हादुच्या चाली । रामा लीछ (?) बाणीत गाती सभा चाहाती सर गवळ्यासी येइना ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel