पति प्रवासी सोडुन गेला ग बाई ॥ संसारीं सुख मज नाहीं ॥धृ०॥

आली भरनवती ही भरज्वानी । राव राजींद्र दावा नयनीं । टाहाव फोडिते मोरावाणी । धनद्रव्याच्या भरल्या खाणी । या नवतीची जळून झाली लाही । सांगा कानीं आवाई ॥१॥

या कर्माचा कैसा ठेवा । मी अपराधी काय तरि देवा । जोगिण होउन शोध करावा । तो सौदागर पलंगिं असावा । या विषयानें अगदिंच झाली लाही । सुचना मात्र करावी ॥२॥

धावा सख्यांनो, या शेजारीं । कधिं येतिल माझे अधिकारी ? । बसले मी रोखुन वाटा चारी । शांतपणें उरिं मारूं कटयारी । या वरुषाची घडि मज जाति ग बाई । कोणती गत करावी ? ॥३॥

या नशिबाचे कैसे ताले । राव राजींद्र महालीं आले । सुखसंतोषें सोहळे केले । भोग आतां तुझें भाग्य उदवलें । रामा छंद करुनि नित प्रसंगीं गाई । चौ मुलाखांत आवाई ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel