राजीवनयना केल्या पैना । शरण तुम्हांप्रती आले जी ॥धृ०॥

कुळीवंताची मी थोराची । माझी लाज तुम्हाला जी । खुणमुद्रा बंगल्या आंत । नेसन शालू गुलाबी जी । मशी एकांत करते यात । मज लालडीच्या लाला जी । लाजूं येऊं किती समजावूं ? । ज्योतीसी ज्योत मिळाले जी ॥१॥

लोभ असावा, राग नसावा । किती मरजी संभाळूं जी ? । पूर्ण कृपाळा मज संभाळा । तप्त शरीर जीव जाळूं जी । गेंद गुलाल नखरा केला । नको रुत घटका टाळूं जी । पहा सुगरावा मुखडा दावा । तुज पाहतां मन धालें जी ॥२॥

हे गुणराशी, तुमची दासी । चमकुन या उभी राहते जी । करिते मात हात गळ्यांत, नेत्र भरुनिया पाहते जी । फार वस्त्र या रंगमहालांत । समजावून गृहीं नेते जी । प्रीत असावी, लाज नसावी । चौथा दिवस आज न्हाले जी ॥३॥

किती समजावूं प्राण देऊ । हात गळ्यंत असावा जी । विषयशांती भोग एकांतीं । माझा नखरा पहावा जी । उभयतांची प्रीत रसाची । साजण गृहीं आज यावा जी । रामा गुणी-जन गाती चाहाती चाहाती । धाक पडे गवळ्याला जी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel