सखे दु:ख सांगुं तरी काय । गत या कर्माची ॥धृ०॥

घरामधिं मी नवि तरणी ज्वान । सुबक ठेंगणी छबकडी छान । मजला नूतन आलें न्हाण । हा दुस्मान परद्वारीं ॥१॥

धुंद कैफाची मदन आली तार । सळसळे गेंद उरावर फार ॥ शरिरीं मदन अति करी कहार । चित ना पार, करूं काई ? ॥२॥

धनद्रव्याला मारुनी लात । वाटतें जावें धरुनी हात । अबरू जाईल जघन्यात । अथवा घात करू कांहीं ॥३॥

सांगा चहुकुनी चार । करावें मन माझें थीरगार । रामा म्हणे मोहिली नार । झाला प्यार पति ठाई ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel