आम्ही आबरूच्या नारी । सजणा, लाजून उभी मी द्वारीं ॥धृ०॥

छेलबटाऊ मी मनमोहना । पाखव्रत मी आहे मनपवना । सुवासिक सुगंध गुलाब दवणा । अपहस्तें मज मारी ॥१॥

बाळपणाची प्रीत रसाची । आली घटका मज वेळ रुताची । भेट झाली आज या हंसाची । जाई सख्या परभारी ॥२॥

का करता हित्येय (?) कंटाळा ? नाजुक कांती तुझी बहु भाळा (?) । दुरुदुरु जाशी, नको करूं थाळा । झाले तुजसाठीं खोरी ॥३॥

आज लई दिवसां मज सापडला । तुजला पहातां विषय चढला । जसा मृगाचा पाऊस पडला । सगनभाऊ अवतारी । रामजी ब्रीदाचा अधिकारी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel