जोडली प्रीत नको तोंडू सगुण गुणीराया । केली अर्पण तुला मी काया ॥धृ०॥

आज काय चुकले सेवेला ? पदरीं घाला । कोण्या गोष्टीचा अंतर पडला ? । संकेत मनाचा केला, भरवसा आपला । दासी पायाची, पहा मासला । जीव जळून रक्षा झाला, सांगूं, कुणाला ? । जखमा भाल्याच्या या शरिराला । हितगुज कोणास मी सांगूं पंढरिराया ? । सजणा ह्या गोष्टी जीवीं धराव्या ॥१॥

मी सासुरवासी गणगोताला त्यजिले । आपुल्या स्वरुपाला पाहुन रिझले । उभयतां प्रीत चालवा म्हणुन मी धजले । मर्जी रक्षितां मी पलंगीं निजले । शिवसांब सदाशिव फार दिवस मी पुजले । विषयाच्या घामानें शरीर भिजलें । आज धरा मजवरी करा कृपेची छाया । पलंगीं गुजगोष्टी मज शिकवाव्या ॥२॥

देह घातला करवीं, मी सांगूं मजला संभाळा । दासी चरणाची पूर्ण कृपाळा । तुम्ही राजबनसी राजींन्द्रा कोमळ चंद्रा आज्ञा पाळा । माझा पाहून मराठमोळा । मनरतन गुणी माणसा भरोसा आपली कोमळ आमळा (आबला) । भोग प्रीतीनें बसून मशीं खेळा । मुखचंद्र तुझा सुकुमार वारंवार उभी मी पाहाया । नको कोठें जाऊं प्राणविसाव्या ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel