सख्या चला बागामधिं रंग खेळूं जरा । सण शिमग्याचा करा ॥धृ०॥

लाली लाल करा पोषाग तुम्ही । रथ सजवून बहु गुणी । आज्ञा करा हो माझे लाल धनी । लाल नेसेन पैठणी । कंचुकी लाल घालिते, आवड मनीं । लाल शोभे तन्मणी । उभयतां जुहार अंगावर लाल शिरा ॥१॥

गुलालगोट घ्यावा लाल हातीं । फेकून मारा छातीं । रंगभरी पिचकारी माझ्या हातीं । तरी करीन या रिती । जसा वृन्दावनीं खेळे श्रीपती । गोपी घेऊन सांगती गुद होईल, हळुच हातीं कुच धरा ॥२॥

बागामधिं आलों रंग खेळाया । करा कृपेची छाया । शुभ्र पातळ महेश्वरी नेसाया । माझ्या स्वामीच्या बसेन शेजारीं रंग पहाया । भोगा कोमळ काया । सख्या मी कमळण, तुम्ही भोग्या भवरा ॥३॥

रंग खेळले गोकुळीं वनमाळी । भोगून चंद्रावळी । त्यामधिं राधिका घेऊन जवळी । ती घटका या वेळीं । मला कवळुन धरावें, घ्या जवळी । शांत होईन त्या काळीं । रामजी म्हणे, कृपा करा सुगरा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel