आज या हो मंदिरीं ।
थाट करुनि उभी मी द्वारीं ॥धृ०॥
गोड गुणाची मशिं प्रीत करावी ।
शरण आल्यावर माझी लाज धरावी ॥१॥
चंचळ प्रकार सख्या मजवर कां केले ? ।
तुजला पाहतां तप्त शरीर हें झालें ॥२॥
हितगुज माझें आतां किति समजावूं ? ।
धरुनिया पदरीं तुम्हां पलंगीं नेऊं ॥३॥
मी आसलाची आसलपण किति पाहतां ? ।
दाहा घरचीं दाहा द्वारें पुजितां ॥४॥
आलक आसल शोधुनी पाहावें ।
दासी पदरची मला पदरीं धरावें ॥५॥
नाथकृपेनें सखे भरपाई झाली ।
रामा म्हणे, तुझी मर्जी मिळाली ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel