रूप नादर त्याची मी मैना । पति मंदिरीं कां आज येईना ? ॥धृ०॥

कपटपणें कां राग धरूनी ? । नूतन नवती जाती विरूनी । भेट होतां आणा कल्प हरूनी । कां करितां मशिं पैना ? ॥१॥

दास पदरची शोधूनी पहा हो । झाले फिदा, मशीं इष्क करा हो । गुप्त रूपें आज मंदिरीं या हो । झाली सख्या माझी दैना ॥२॥

राग धरूनी मशीं त्यागुन गेला । मज लालडीचा छेलछबेला । कोण सवत भुलली सख्याला ? । मी त्याची गुणगहिना ॥३॥

या रंगमहालीं शेज करुनिया । थाट करुनि उभी वाट धरुनिया । भोग सखा आज ह्रदयीं धरुनिया । रामा म्हणे सोड मनची कल्पना ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel