लक्ष्मी फाकडी भली छबली बनली ग । बर्‍या ग तुझ्या गायनकलेच्या चाली ॥धृ०॥

वय वर्षे उमर पंधराची नवतीमधिं पुरी । जसा लोट द्रव्याच्या लहरी । खुब पाकसुरत अनिवार ऐन्यामधिं खरी । भली ग नारी मूर्त तुझी गोजिरी । तुझी चाल पाहुन अंबिरी । पडलों भरी ग लुटपुट केलें त्वा नारी । कैकांच्या ह्रदयीं चुटका लावलास भली ॥१॥

पैठणी साडी नेसोनी झोक लावुनी । भला ग जरीपदर रुळतो धरणीं । किनखापी चोळी कसुनी । कुचाग्रें दोन्ही ग, जसे गेंद भाल्याची अणी । अंगावर कुल येरयान जरा न्हाउनी (?) । जडाव मोती हिरकणी । ओठ पवळी वेलीच्या परी बत्तीशी रंगली ॥२॥

पिशवाज जरीचा शेला अंगावर घेशी । तमाशांत उभी राहसी । जसी इंद्राची रंभा नार तूं होशी । सुरतालबंदी खुब धरशी । असे कैक पहायासी तुला येती नारी हौशी । मजलस खुष तूं करशी । चौगर्दा लालीलाल गादी त्वा केली ॥३॥

ह्या ठाण्या शहराचे लोक अंबीर भले । तुझे ख्याल तमाशे केले । इंग्रजी रुपयांचे तोडे तुला दिले । दैवाचे लाल रंगीले । कवि सिदराम लहरीचे ख्याल रसीले । ऐकून कवि छेक झाले । तुरा कलगीवर शिरताजे तुझा एहिवाली (?) ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel