गेले टाकुनिया, सुंदरी आकांत करी । जिवाला श्रम होतो भारी ॥धृ०॥
नूतन वय माझें, भरजानीचा भडका । जसा म्हैसा मारि धडका । तुला चाकरीची इतुकी तरी आवड कां ? । घरीं माहापुर पैकाअडका । कशाला लस्कर ? । त्यावरी पडें द्या तस्कर । थोडकीच दौलत खुसकर । पत्रें धाडिते नारी ॥१॥

कठिण मन केलें मजविषयीं प्राणपती । तुला पत्रें धाडू किती ? । तूं नाहींस मंदिरांत, मंदिरांत मंदमती । तुझी मज वाटतसे ख्याती कशाची निद्रा । तूं नाहींस धैर्यसमुद्रा त्यामुळें कपाळीं भद्रा । रुद्रा, तूं पाव तरी ॥२॥

ऐक सये बाई, कोपला गे कंसारी । मला सुख नाहीं संसारीं । असें नित्यानि पतीचें दु:ख नवसारि (?) भज्या कैची बा चव सारी (?) । फजीती मुबलका । काय घोडा उडवुनी अबलख । दप्तराशीं नसल्या तबलक । कागद चहूंकडे चारी ॥३॥

निराशा जाहली, मग सुंदर बावरली । महा सक्रोधें सावरिली । गेली पंढरीला, देवाभोंवतीं फिरली । विठोबावर रागें भरली कीं जाहाली तंबर । पावले स्वामी चीतांबर । ब्राह्मणाशी वाटी पीतांबर । शत गोदानें करी । छंद फंदी अनंत ललकारी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel