नटली नट गजभारी करूं फार स्नेह संग चांगला ।
बाण जिव्हारीं भेदला । तुजकडे पाहतां सर्व मश्चित मन गार ॥धृ०॥
मंजुळ बोले, गर्कन, डोले, नागिणा जशी । चमकत चाले, नैन लाले, नोक मारसी । नार समतोले गेंद गोले कामिना जसी । अग नारी ! विषय चेतला ॥१॥
करुन शिणगार नोकदार फाकडीचा । गळा हार धमके, हिरा चमके राखडीचा । माषूक मुखडा, हाले आंकडा हालकडीचा । अग नारी, भोगावी तुला ॥२॥
अंगी चोळी तंग, गोरा रंग गोजिरवाणा । शोभे शालु हिरवा दिसे बरवा साजिरवाणा । कोणाची तूं अबला ? तुझा बोल लाजिरवाणा । अग नारी, भोगावी तुला ॥३॥
समजुन सार सुगर नार चतुर अंगीं । हर्ष उभयतां, नसे द्वयाता त्या प्रसंगीं । सगनभाऊ गाती, सभा च्याहाती त्या प्रसंगीं । छंद कान्हूचा भला । भाण जिव्हारीं भेदला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel