मन धरितां करितां अर्जी ।
वरकांती रक्षितां मर्जी ॥धृ०॥
संतोषाचा उदार तुमचा नाहीं घेतला कर जी ।
शोध करूनी पाहील तो शोधिक वरकड मतलबगरजी ॥१॥
नाही गोष्ट एखादी विषादीं पडू न वरचेवर जी ।
विष्कपथ जहराचा पेला पचवून राखा गरजी ॥२॥
स्नेह घडल्यावर प्रीत जडल्यावर ठेवू नको अंतर जी ।
मात करून प्यादा गेल्यावर काय करिल मग फर्जी ? ॥३॥
सगनभाऊ म्हणे विकल्प त्यागुन विठ्ठल ह्रदयीं स्मर जी ।
कवी कान्हु म्हणे पडल्या प्रसंगीं समय प्रति सादरजी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel