‘नित रावजी जातां पाहातां, कुठें तुम्ही राहातां ?’ ‘सखे करितों फेरफटकां’ ।
‘भरलें वेड दोड, सवती बोलती गोड गोड, तिचा लागला तुम्हां चटका ॥धृ०॥
तुमच्या पायापाशीं लक्ष सदोदित असे, पक्षावाणी वाट पहाते ।
देतां धापा, मारतां गपा, यांत काय नफा ? मी जीवीं आपल्या खाते ।
कां करिता असें ? कसें भरलें तुम्हां पिसें ? जसे बोलतां रागा हाते ।
माझी नवी नवती पतिविण व्यर्थ जाते ।
नेसतो (?) नखरा पाहाल, हुवाल खुशाल, भाल (?)
आज चवथा दिवस न्हाते ।
करा खटपट, पटपट मी पाया कीं हो पडते ।
विषयव्यथा लागला बाण ।
नाहीं देहभान, होई भणभण ।
कळ वटींत, लाही भट्टींत जशी, जातो प्राण ।
धरा माशी, जी होईन खुशी, नको अनमान ।
मेळवीन करीन सन्मान, देइन अधाराचें पान, जाण आहे हीच घटका ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel