डाकुरजीने चित्ताजोगा हौसेचा जोडा ।
भाग्याची मी मृत पावले, चुकल जन्म चढा ॥धृ०॥
जाण तयारींत, शान फाकडी, निशाण जरीपटका ।
नित्य नवा पोषाक भरजरी, सोनेरी पटका ।
राघुपुढें उभी बनून साळु दक्षण फटका ।
राघुपुढें उभी बनून साळु दक्षण फटका ।
शुभ नक्षत्र मुहूर्त पाहिजे सोन्याची घटका ।
बावनकशीच्या कशीं उतरली भरियली घटका ।
तुकीं उतरले किंचित थोडे, जीव थोडा थोडा ॥१॥
ऐका सख्या शिरताजा आणुन नारी कसणी कसल्या ।
काळ्या सावळ्या गोर्‍या भुरक्या कसा लाऊन कसल्या ।
नावासारखी द्यावी देणगी सोन्याच्या हसळ्या ।
हें समजुन धनी मान्य करावें, कल्पना ठसल्या ।
तुकी उतरले किंचित थोडे जीव थोडा थोडा ॥२॥
मधु मंजुळ कोयाळ टाहो फोडून बोले ।
रसवंतीचें गोड अक्ष्रर कधिं कोणीं केलें ? ।
ज्या झोकावर रावराजेन्द्र पहा कसे डोलविले ।
ठावें नाहीं तुम्हां, पाही, मी नथजडाव ल्याले ।
नाहीं तर उगाच रुसल्या फुगल्या जाणत नाहीं मुढा ॥३॥
प्रसन्न झालों, माग साजणी, पुरविली इच्छा ।
कगन देऊंअ कां देऊं साखळी ? देऊं शाल गुजरातीचा ? ।
कर जोडुनीया उभी सुंदरी, पाय इष्काचा ।
हें समजुन मान्य करावें प्रश्न सदगुरूचा ।
सगनभाऊ जेजुरीचा वागवी ब्रीद नाम तोडा ।
रामा कवीच्या गुणावरती फंदीचा जीव वेडा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel