तूं गुल्यानार गुलपरी बोले मैना ।
ही इष्क जखम भाल्याची भरुन येईना ॥धृ०॥
लहानखुरी जान तयारींत ओठ शिरा ।
नाजुक रुपडें, कंठावर हिरव्या शिरा ।
दंडभुजा कशा पहिला माल कोरा ।
चिमणे जोबन यानें केला आमचा मारा ।
आम्ही हुशार झालों, लाजुन ठेर जरा ।
हे वीर बडुदे गुजराथेचा वारा ।
आम्ही छंदी फंदी इष्कबाज शोकी ।
झालो गर्क शरिरावर पाहुन नोकी ।
तुं नटबाजिंदी दक्षिणची शोकी ।
तुझें चलनवलन पाहुन आनंद मना ।
आम्ही पाहात आलों हा तिसरा महिना ॥१॥
तुझें नाव जैना, गुणग्राहिक नाव तुझं ।
प्रीत कोण्या रीतीनें करशील ? सांग मज ।
दीप लाव आतां, भरली तिन्ही सांज ।
लक्ष्मुची वेळ, गोडस बोल आज ।
शिक्क्याची देवघेव करणें लागे आज ।
वचनाचे तोडे पुढें पडले मोज ।
या माया प्रपंचे संसारासाठीम ।
आतां कुणी कुणाचें नाहीं ग शेवटीं ।
मोहोनी घालुनिया कर गे लुटालुटी ।
आतां उशीर कां गडे ? पाहुं नको चवना ।
चाल देवदर्शना, तटली सकळ सेना ॥२॥
आहो राजअंबीरा, तुम्ही लोक गाढे ।
कीर्तवान तुमचे मुलखांत पवाडे ।
उत्तर ऐकावें निवांत निवाडे ।
आपली पट्टराणी सोडून भलतीकडे ।
प्रीत कशी करावी ? पहा त्या चंद्राकडे ।
ज्योतिशी ज्योत मिळाल्यावर भ्रांता उडे ।
असें काय बोलावें ? समजुन जैन बोल ।
उत्तरासी प्रतिउत्तर द्यावें अनमोल ।
हा कवळा हरबरा दोही नखानें सोल ।
आतां उशीर कां गडे ? पाहुं नको चवना ।
चल देवदर्शनास, तटली सकळ सेना ॥३॥
ऐकुन घे साळू, दक्षणचे वाणी ।
स्त्रीपुरुष चांगले मस्त गजावाणी ।
द्रष्ट भेत होतां शरीराचें पाणी ।
कबजांत आणून पुढें ठेव साखरलोणी ।
ऐकुन घे गडे दक्षणचे वाणी ।
दम काय पुढें जातील हिंदुस्थानी ।
टुक दर्शन द्यावें, हा एक मोठा लाभ ।
उभयतां असुं द्या भरमाभरमी लोभ ।
विषयाची करम समजत नाहीं जरा ।
चतुराशिवाय घडोघडी समजुत होईना ॥
म्हणे सगनभाऊ दरदीच्या आलें मना ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel