सख्याचीं पत्रं सायंकाळीं । वाचून पाहाती गुणवेल्हाळी ।
प्रस्थान प्रात:काळीं । तुज गृहीं येतां ।
सख्याची सखी सांगती सखीला । माझा भोगता खुषी झाला ।
रात्री येतो आज वस्तीला । तुज सांगितलें ।
आज्ञा रसवंती राजस । माझ्या मनांत होती हौस ।
पाहून झाले जगन्निवास । भाग्य उदवलें ।
साधा शिणगार तर्‍हेचा करिते । तरी ते पान्यामधिं रस भरिते ।
आडवी जाते बनुन त्वरीत । तारा चमकली ।
डोळे भरून मजकडे पाहाते । पाऊल चोरून बरोबर तें ।
आदरें गुजगोष्टीं सांगते । राजसरंगा ॥१॥
दीप-समयांची रोषनाई । सखि म्हणते राजा पाही ।
तिथून गुप्तरूपें लवलाही । सख्याच्या अंगणी ।
बालंपेचाचे पागुटें । दुपेटा हिरवे नक्षे बुट्टे ।
अंगावर ज्याहार चमचमाट । सूर्य गगनीं ।
बुधि त्या करची राजसबाळी । मस्तक चरणावरती पुतळी ।
ठेवून सखा धरि करकमळीं । या सुखशयना ।
किंचित धरित पदर घेऊं । मराठमोळा आपला दाऊं ।
रोख पंछीवरता ठेऊ । स्ट (?) चित्ताजोगा ॥२॥
सिद्ध सैंपाक पाक । पाक पकवान्नाचें नाम ।
जाणे खाज्या करंज्या फेण्या । हातामधिं तेलपोळी ।
घिवर, घवले, मांडे, बुंदी । केशरी भात मिठा सुगंधी ।
शर्करा घालून सिद्ध । करिती पुरणपोळी ।
शाखा करदुळीच्या पुरचांची (?) । आणिक
कवळी सेंग चवळीची । भाजी हिरवीगार मेथीची । वांगी सगळी ।
झालस्या (?) पुस्पाच्या (?) हरजिनसी । रांगुळी घालुनीया पात्रासी ।
सख्या उठा भोजनासी । अहो जिवलगा ॥३॥
चोपाळ्यावर बसला फाकडा । एक झोक्यास एक विडा ।
कलगीशेजारीं केवडा । सख्याला लागा (?) ।
असे पांच विडे गोविंद । सुखांत घालितसे सुगंध ।
प्रीतीचा कलमे न लगे बोध्य । असा रंग होवा ।
येक झोक जरी साधिला । पतिस स्या (?) झोक्यास अंतर पडला ।
जिंतिले राजबनसी बावरे । हारविले गर्वा ।
सखी म्हने दासी होउन राहीन । जिकडे जाल तिकडे येईन ।
क्रिष्णाबाई तुंगभद्रा पाहिन । याच प्रसंगा ।
सगनभाऊ गातात जी दरदी कोण दशा सांगा ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel