मी लेकुरवाळी । अंगसंग हा पुरे करा हो, मुख कुरवाळी ॥धृ०॥
शरिर अशक्त । त्यांत सासुसासरे वडिल, दीर झाले विभक्त ।
नसे संशय यांत । पहिल्यासारखी प्रीत चालवणें, झाले इथुन पोक्त ।
बाळ थान पेतं । उठुन विडो द्यावयास येते, मोठा कठिण वक्ता ।
चढली काळूखी, तोंड चुकविलें, नाहीं पडलें काळी ॥१॥
वांजखडा घेते । पुष्कळ द्रव्य खर्च करूनिया मोकळी राहाते ।
आतां कोणास भिते । मला नांदणें प्राप्त जीवाला आप दु:ख देते ।
लाजुनी जनातें । हालत पाळणा जे ते म्हणते पोट पिकूं परते ।
जें करणें तें मजकडे पाहून आपल्या करची मळी ॥२॥
बरी बोलून खरी । आपण उभयतां क्रिया केल्या जाऊन कृष्णातीरीं ।
मानेवर सुरी । कोण ठेवली होती मजला सांगा राजेश्वरी ।
चिकी आल्या आजवरीं । चव लागली जिवाला तुमच्या तृप्तता शरीरीं ।
विकले जाऊं तुझे पायीं गे संसाराची होळी ॥३॥
विकले जाऊं नका । काया दान तुम्हांला केली ।
अर्पण मजला विका । प्रार्थना विषय कल्पना ऐका ।
शोधुन पहावा समर्थाचा शिक्का ।
मग महालांत झुका । हेतु प्रीतीनें गोष्टी सांगेन, हासुन देइन मुका ।
सगनभाऊचे गुण करुणाकर तारक वनमाळी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel