हे कमळिणी, सखे साजणी, कां अजा अली बोलाऊं ? ।
चल म्हणतो पाण्या जाऊं ॥धृ०॥
पाण्या जातांची तिनें पाहिलें, रात्रीं रंग कैसा झाला ? ।
पतिसंगे नाहीं रमला ।
खरें सांगतें, जिवलग गडणी राजा पलंगावर आला ।
झोंबत होते पदराला ।
बहु प्रीतीने विडा चाविला, टेकुन बसले छातीला ।
तसाच डोळा लागला ।
स्वामी निजले, निचिंत पडले, उठविते सेरसेरमावु (?) ॥१॥
खरें मला हें भासत नाहीं, शरीर सारें रवरवतें ।
नाहीं घडला एकांत ।
मुखकमल टवटवित दिसते डोळ्यांमधिं चंद्रज्योत ।
झळक मारती गालांत ।
किल्ल्यावरती हल्ला चढला, जोबन नाहीं गवबस्त । (?)
नाही जुळले कुस्तींत ।
झटापटीची खूण वेगळी, कां करतीस च्याऊमाऊ ? ।
सांग नको संशय ठेऊ ॥२॥
असो परंतु चक्क पुसतों, वंधा तुझा कीं भ्रतार ? ।
तूं जनुं दिसतिस हिंवर ।
तें कांहीं नाहीं रणमंडळांत पंचहत्यारी रणशूर ।
गगनीं जैसा शीतकर ।
रात्र तुम्हांला उभयतां गेली कशी पलंगावर ? ।
कामचेतना बरोबर ।
तूं आवडती पति नावडता चल उभयता रंग पाहूं ॥३॥
पनघटावर पाणी भरलें, शिरीं घागर भरपुर ।
चल बाई झरझर ।
येकांतीच्या ठाईं गोष्टी सुंदर पुसती मजकूर ।
कां नाहीं घडला व्यवहार ? ।
स्त्रीपुरुष आम्ही दोघें निजलो, झोपेची आली लहर ।
प्रकाशला गगनीं शुक्र, जाग्रत होतां मनांत भ्याले
गजबजला सारा गावूं सगनभाउ चे गुण घेऊं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel