कां हो घ्या ना विडी ? अशी कोण नार फाकडी ? ।
रोज मजविशी घातली अढी अढी ॥धृ०॥
पहिले दिस तूं कां रे विसरला ? ।
ममता लावुन कां दुर झाला ? ।
चित्तापासुन सांगा मजला । समजाविते तुज घडोघडी ॥१॥
असें मजला जरि ठाउक असतें ।
पहिलेच मी तुजलागी कसते ।
आढी धरून तुजवर कां रुसते ? । प्रचीत आली रोकडी ॥२॥
कोण सवत पाहेली मजवरते ? ।
मोहिले तुजला अजवरते ।
इष्क लागला तुमचा तिजवरते । उमज आतां तातडी ॥३॥
असें उत्तर ऐकून सख्यानें ।
ह्रदयीं धरिली सखी हर्षानें ।
होनाजी बाळा चीं प्रिय कवनें । जाती अमृतघडी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel