तूं बस या पलंगी राजसा ॥धृ०॥
आहा मदन वृत्तीहि त्यागिली । दुरिता शिराणी भागली ।
क्रिया आपुल्या मागली । विषय मोहनी चांगली ।
मुर्ती तुझी म्या भोगिली । चटक इष्काची लागली ।
समजुन पुरता भरवसा ॥१॥
तीक्षण मर्जि पाहिली । सुक्ष्म तनु कां मायली ।
मंदिरांत घडि ही साहेली । आज म्या तुमची वाहेली ।
वृत्ती विषयाची राहिली । मग तुम्ही दुसरी बाहेली ।
हें पाहुन हा जिव पिसा ॥२॥
प्रीत दुसरी कुण गांठली । मज भीड सन्मुख वाटली ।
ती वेळ सवखे लोटली । कंचुकी दर्वश (?) दाटली ॥
मग दु:ख शरिरीं वाटली । श्ने (?) रुता सवती थाटली ।
रंग नवतीचा पहा कसा ॥३॥
आणले गुंफुन हारतुरे । तुम्ही सख्या विष्की पुरे ।
दिसतां छेबदार खुब झुरे । करा अशी कीर्त जागीं उरे ।
होनाजी बाळा कविश्वरे । हे रामा अंदु चातुरें ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel