चल सखी येतो सर्व जाऊं त्यजुन गोकुळ या श्रीरंगाचे मागें मागें ।
रात्री मोहुनीया नंद यशोदेसी ।
नेती अक्रुर हरिलागी मथुरेसी ॥
दृष्टी कैचा मग पडेल ह्रषीकेशी ? ।
जातो स्वाम पूर्ण काम शाम राम धाम ग्रामीं या तमाम अग्नी घ्या गे ॥१॥
गोकुळींच्या हत्त्या कीं सर्व आतां ।
अक्रुरा, ह्या पडतील तुझ्या माथा ।
नको नेऊ मथुरेसी जगन्नाथा ।
असें बोलु त्या नीधान म्लानवाण जाग दान, आण घालोनी प्रमाण
त्याचे घ्या गे ॥२॥
दिसे अक्रुर हा क्रूर मोठा बाई ।
यानें बोधुनिया नंद-यशोदाही ।
नेतो आमचा जिवप्राण शेषशायी ।
हा रे जळ येक आम्ही मीन तयाविण दीन लीन हीन लक्षणक्षिण
अम्हां लागे ॥३॥
सखे क्षणभर रथ नाहीं थांबविला ।
कसा दुर्जन हरि दूर लांबविला ।
जिवा अक्रुरें चिंताग्नी झोंबविला ।
गिती होनाजी बाळा गाये, धायपाय साहे लाहें सर्वथा हे न्याय
मागे (?) ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel