प्रियकर माझा गुणिजन रावा । छानछबेला दृष्टि दिसावा ।
या सुखशयनीं नित्य असावा । कधिं दर्शनलाभ देतो ? ॥१॥
वर्षाची मजला साजणी घडी जाती । धन स्वप्नीचें लाभ नसे ।
जागृत होतां कुठें न दिसे ग बाई । पती गेले असें मजला जाहलें गे ।
बाइ मज त्याची याद होती ॥२॥
वाटे उदासी माझ्या मनाशीं । दु:अख अंतरींचें सांगुं कुणाशीं ? ।
आग लागो या सर्व धनाशीं । शरिराची जाहली माती ॥३॥
ध्यास सख्याचा करितां आले ग बाई । दृष्टी पडतां प्रेमें डोले ग बाई ।
होनाजी बाळा गुणी जन बोले बाई । काशी म्हणे हो शांत वृत्ति ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel