येतील स्वामी कधीं कधीं ? ।
यासाठीं धाय धाय रडते बसुन अंगणामधीं मधी
फार दिवस जाउनी, गेले तरि कोणिकडे ? ।
येत्याजात्याला पुसते, पर कोणी सांगेना सुधी सुधी
संसारामधें अम्ही दोघेजणे, नाहीं तिसरे कोणी ।
त्यांतुन ते दुरदेशिं राहिले, मला टाकिली जुदी जुदी ॥२॥
रात्र होत दिड प्रहर, औशिचा मदन पेटतो जेव्हां ।
तें संकट वैर्‍यास नसावें, मी धरुं किती अवधी अवधी ? ॥३॥
मी सख्याला फार अवडती प्राणाहुन पलिकडे ।
कसें झालें भगवंता न कळे, नवल घडविता विधी विधी ॥४॥
कांहिं दिशिं घरधनी आले, मग होनाजी बाळा म्हणे ।
असाच निश्चय ठेव निरंतर सखे पतीच्या पदीं पदीं ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel