जवळ बसा चिकटून, कां हो दुर दुर जैसे पाहुणे ।
आज फारा दिवसा जाहलें येणें ॥धृ०॥
दिवसरात्र जातसे जिवावर चळ भरल्याचे परी ।
आठविते गुण तुमचे परोपरी ।
फुरफुरती कुच उरीं, दाटली तट चोळी कोपरी ।
शरिरामधें भरली कापरी ।
नका लावुं सरसगट, बरोबर नव्हे पांच खापरी ।
किती सांगावें याउपरि ? ।
कोणाला नकळतां हळुच पाठविते बोलावणें ॥१॥
मर्जिचा कल बघुन, आपला पाय भिउन टाकिते ।
जपुन भिडमर्यादा राखिते ।
उभी राहुन खिडकींत, घडोघडिं सखा सखा घोकिते ।
तुझ्या वाटेकडे अवलोकिते ।
नाही ताठयाची गोष्ट कधीं, मृदु मेण जशी वाकते ।
पदर लावुन हासते, खोकते ।
नित्यनेम दर्शनाविण मज हें अन्नपाणी उणें ॥२॥
नाहीं जनाची आशा, पुढें म्या जीव ठेवला रोकडा ।
आतां कां शब्द तुझा वाकडा ? ।
विषयानळें संतप्त, जसें नवनीत कढे कडकडा ।
दोर हा वावडिचा आखडा ।
गोड वाटे शेजार, फार सकुमारो पुरुष फाकडा ।
कालपी साखरेचा खडा ।
पर्जन्याविण भुमी तसे व्यर्थ काय माझें जिणें ॥३॥
मला अंतरचा नाभिकळवळा, निधी केवळ शांतिचा ।
जडित चंद्रहार येकांतिंचा ।
येक पळ पळ कमिते लागला निजध्यास खंतिचा (?) ।
असावा लाभ मला पंगतीचा ।
आंतबाहेर सारखी, नव्हे लोका परलोकांतींचा
करा सुखसोहळा सिरिमंतीचा ।
होनाजी बाळा म्हणे, तुला वाखाणी सारें पुणें ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.