जो जो जो जो रे त्रिनयना । निज बा पंचानना ।

सृष्‍टीसंहार तमोगुणा । भोळ्या निर्मळ मना ॥ध्रु०॥

सृष्‍टी संहार तुज तेणें । बहु झालीं जागरणें ।

तो भ्रम सांडूनियां त्वां देणें । निजीं निजसुख घेणें ॥जो०१॥

भिक्षाटण करिताम अवधूता । श्रमलासी बहु फिरतां ।

सोडुनि निजकांता त्वां वसतां । केला डोंगर माथा ॥जो०२॥

ऐसा बैरागी निःसंगी । होतासी तूं जोगी ।

तो तूं स्‍त्रीलागीं अर्धांगी । घेऊन फिरसी जगीं ॥जो जो॥३॥

अहा त्वां कैसें तप केलें । तुज भिल्लीनें भुलवीलें ।

बाळपणासी धरियेलें । बायलेच्यानि बोले ॥जो जो०॥४॥

ऐसा निलाजरा तूं अससी । शंका नाहीं तुजसी ।

किती रे सांगावें तुजपाशीं । त्र्यंबक प्रभु सुखराशी ॥जो०५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to पाळणे