पश्चिमेला लव याला लवपूर (लाहोर),  पूर्वेला कुश एका कुशावती, तक्ष याला तक्षशीला, अंगदला अंगद नगर, चंद्रकेतूला चंद्रावती. कुशने आपले राज्य पूर्वेच्या दिशेने पसरवले आणि एका नागवंशी कन्येशी विवाह केला होता. थायलंडचा रज्जा त्याच कुश चे वंशज आहेत. या वंशाला चक्री वंश म्हटले जाते. रामाला विष्णूचा अवतार मानले जाते आणि विष्णूचे शस्त्र आहे चक्र, म्हणूनच थायलंडचे लोक चक्री वंशाच्या राजांना "राम" ही उपाधी देऊन नावासोबत आकडा जोडतात. जसे सध्या राम (९ वे) राजा आहेत ज्यांचे नाव "भूमिबल अतुल्य तेज" आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel