या धरतीवर आतापर्यंत झालेल्या संशोधनातून या शोधणे पुरातत्व वैज्ञानिकांना सर्वांत जास्त हैराण केले आहे. अमेरिका येथे सन १९३४ मध्ये १४० मिलियन वर्ष प्राचीन लाईमस्टोन च्या पहाडांमध्ये एक लोखंडाची हातोडी मिळाली. वैज्ञानिकांनी जेव्हा प्रयोगशाळेत त्याचे अध्ययन केले तेव्हा ते दोन गोष्टींमुळे हैराण झाले. एक म्हणजे हातोड्याला असलेली लाकडी मूठ आतून काळी पडलेली होती, याचाच अर्थ ती कित्येक लक्ष प्राचीन होती, आणि दुसरे कारण म्हणजे लोखंड एकदम शुद्ध अवस्थेत होते. एवढे शुद्ध लोखंड जगातीन कोणत्याही खाणीतून आजपर्यंत निघालेले नाही. लोखंडाच्या शुद्धतेचा अंदाज या गोष्टीवरून लावता येईल की १९३४ साली डोंगरातून तो हातोडा काढत असताना त्यावर ओरखडा आला होता, पण आज ८० वर्षे झाली तरी त्यावर गंज लागण्याचे कोणतेही लक्षण नाही. वैज्ञानिक या हातोड्याचे अनुमानित वय १४५ ते ६० मिलियन वर्षांपूर्वीचे मानतात म्हणजेच करोडो वर्ष प्राचीन, परंतु मानव जातीने केवळ १०००० वर्षांपूर्वी अशा प्रकारची अवजारे बनवणे आत्मसात केले होते.