ब्रेकिंग व्हील ला कॅथरीन व्हील या नावाने देखील ओळखण्यात येत असे. त्यातून पिडीत जिवंत वाचत नसे. पण हे पिडीताला एवढे हाल हाल करून मारत असे की पाहणाऱ्यांच्या जीवाचा थरकाप उडत असे. पिडीताला व्हील ला बांधून त्याच्यावर हातोड्याने तोपर्यंत प्रहर केले जात असत जोपर्यंत त्याच्या शरीरातील सर्व हाडे मोडत नाहीत. मग त्याला मृत्यू येण्याची वाट पाहत ठेवले जात असे. कधी कधी पिडीताला एका उंच व्हील वर बांधले जाई जेणेकरून पक्षी त्या हात-पाय मोडक्या मनुष्याला जिवंतच खाऊ शकतील. असे देखील म्हटले जाते की ज्यांची दया येत असे त्यांच्या केवळ छाती आणि पोटावर हातोड्याने वार करण्यात येत असत. अर्थात, पिडीत त्यादेखील अवस्थेत जिवंत राहत नसे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.