ओक यांच्या मते बादशहानामा नावाच्या पुस्तकात लिहिलेले आहे की राजा जयसिंग याच्याकडून अकबराने मोठे घुमत असलेले एक भवन घेतले होते केवळ मुमताजला दफन करण्यासाठी. सन १६६२ मध्ये औरंगजेबाने बादशाहाला चिठ्ठी लिहिली की जिथे मुमताजला दफन केले आहे ती इमारत एवढी जुनी झाली आहे की त्यात पाणी आत झिरपू लागले आहे. अशात बादशाहने त्यांना तिथली डागडुजी करण्याचा आदेश दिला. जर ही इमारत शहाजहानने बांधली असती तर त्याची इतक्या लवकर डागडुजी करण्याची वेळ आली नसती. असे देखील सांगितले जाते की राजा जयसिंगाला अकबराने दोन आदेश पाठवले होते ही इमारत आपल्या हवाल करण्यासाठी आणि हे दोन्ही आदेश आज देखील जयसिंगाच्या दस्तैवजांत सामील आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.