एक दिवस मुलाचा एक मित्र त्याच्याकडे एक - दोन दिवसांसाठी त्याचे गाढव मागण्यासाठी आला. मुल्ला आपल्या मित्राला चांगले ओळखत होता आणि त्याला त्या मित्राला गाढव द्यायचे नव्हते.

मुलाने आपल्या मित्राला सांगितले की त्याचे गाढव कोणीतरी घेऊन गेले आहे. नेमके त्याच वेळी घराच्या मागे बांधलेले मुलाचे गाढव रेकू लागले.

गाढव रेकण्याचा आवाज ऐकून मित्राने मुल्लावर खोटे बोलण्याचा आरोप केला.

मुल्ला मित्राला म्हणाला - "मला तुझ्याशी बोलायचे नाही, कारण तुला माझ्यापेक्षा एका गाढवाच्या बोलण्यावर जास्त विश्वास आहे."

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel