उशिरा उठणारे लोक दररोज घडणारी निसर्गाची अलौकिक अशी प्रतीत होणारी गोष्ट पाहू शकत नाहीत - सूर्योदय! रात्र काळ्यातून गर्द निळ्यामध्ये बदलते, मग हलक्या निळ्या रंगत आणि मग आकाशाच्या कोपऱ्यात दिवसाची सोनेरी चाहूल लागते. निसर्ग अपूर्व रंगांच्या छटा साजऱ्या करतो. या वेळी धावायला जाण्याची मजा काही औरच आहे. धावत असताना मी जगाला सांगतो : "किती शानदार दिवस आहे! खरंच!"
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.