अलीकडेच माझ्या एका पेशंट रोज सकाळी ४.३० वाजता उठण्याची सवय, त्याचे फायदे आणि उठण्याच्या उपायांसंबंधी विचारले. त्याचा प्रश्न अगदी चांगला आहे परंतु खरे म्हणजे मी देखील या बाबतीत गंभीरपणे विचार केलेला नाही. तसे पाहता या सवयीचे काही फायदे जरूर आहेत जे मी तुम्हाला सांगू शकेन. सर्वांत आधी मी तुम्हाला असे सांगेन की जर तुम्ही रात्रजीवी असाल आणि त्यातच आनंदी असाल तर तुम्हाला तुमची सवय बदलण्याची काहीही आवश्यकता नाही. माझ्यासाठी रात्र घुबडा सारखी जागून काढल्या नंतर सकाळी लवकर उठणारा जीव बनणे मोठे परिवर्तन होते. त्यामुळे मला इतके सारे लाभ झाले की आता मी कधीही उशिरा उठणारच नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.