अमेय तळ्यात पडला, मोठ्ठा आवाज झाला आणि अॅनाच्या तोंडावर पाणी
उडाले.....
ते पाणी
खुप लालसर आणि काळपट होते. भयंकर भासत होते.....
त्या
पाण्यातल्या प्रत्येक थेंबातून असंख्य जलजीवा तयार झाले.....
ते सगळेजण
अॅनाकडे भेसूर हास्य हसत येवू लागले.....
अॅना
घाबरून ओरडणार इतक्यात तीची तंद्री (ट्रान्स) भंग पावली.
तळ्यात तसे
काहीही झालेले नव्हते. तळ्यात अमेय पडला नव्हता.
खरेच अमेय
या तळ्यात पडला असता तर?
तो आज
आपल्याला भेटला असता.
पण तसे
दुर्दैवाने नव्हते.
मध्य
प्रदेशातल्या त्या अंधार्या जंगलात सगळेजण स्तब्ध होवून रॉबर्ट गॉडमन चा आवाज
फोनवरून ऐकत होते.
गॉडमन पुढे
म्हणाले,
" मानवांना जलजीवा बनवून जेनिफर
डेविल्स स्क्वेअर वरच्या भागात खुप दहशत पसरवत होती.
त्याच
भागात त्यांना छळ करून मारल्यामुळे तेथे त्यांच्या सैतानी विचारांची शक्ती जास्त
प्रभावी होती. त्या भागात शिरणारी जहाजे, विमाने आजही नष्ट होतात. त्याला कारण हे
मानव-जलजीवा. मूळ जलजीवांना गरम बर्फात गोठवून जरी नष्ट केले तरी जलजीवा बनलेले
मानव हे त्या भागात त्रास देतात. आजही त्या भागात अद्भुत घटना घडतात.
विमान
चालले असेल तर ढग रुपात विमानाला वेढा घालून ते विमान नष्ट करतात. जहाजावर बर्फ
रूपात हल्ला करून विध्वंस घडवून आणतात. सैतानी शक्ती शेवटी दुसरे काय करणार? विनाश, विध्वंस हेच!
अॅना
म्हणाली,"पण मग हे
सगळॅ जलजीवा हे अत्याचारीत आहेत. त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. अत्याचारामुळे
ही शक्ती जन्माला आली आहे. त्याचे काय?"
गॉडमन
म्हणाले,
"बरोबर आहे. त्या जलजीवांनी
अत्याचार करणार्या त्या सगळ्या सैनिकांचा बदला घेतला आहे. त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना नष्ट केले आहे. पण आता ते
सैतान झाले आहेत. सूडाने पेटले आहेत. ते पूर्ण मानवजातीवर सूड घेतील...."
अॅना
म्हणाली, "मग आता काय
करायचे? कसे
संपवायचे त्यांना? आणि अमेयला
कसे शोधायचे? आणि कसे
मानवरूपात आणायचे?"
गॉडमन
म्हणाले,
"त्यांना पाण्याच्या चौथ्या रुपात
फक्त गोठवून ठेवता येते पण नष्ट करता येत नाही. त्यामुळे आता जरी आपण त्यांना त्या
चौथ्या रूपात गोठवले तरी ते पुन्हा येवू शकतात. कुणीतरी पुन्हा हिरवी माती घेवून
त्यांना जीवंत करेल. आणि कुणी त्यांना जीवंत करू नये म्हणून ही सगळि माहिती कायमची
नष्ट करावी असे जर ठरवले तर ते काम सोपे नाही. आजच्या इंटरनेट्च्या महाजालाच्या
रूपात ती माहिती कुठेही डीजीटल रूपात अस्णारच आहे. त्यामुळे त्यांना कायमचे नष्ट
करता येईल का असा मी विचार करत होतो.. रिटायर झाल्यानंतर मी त्यावर संशोधन केले
होते. तो प्रयोग करण्याची वेळ एवढ्या लवकर येईल असे मला वाटले नव्हते. "
अॅना आणि
सर्वजण स्तब्ध होवून ऐकत होते,
"पाण्याला म्हणजे त्या जलजीवांना
आधी चौथ्या रूपात आणायचे.....
मग त्याला
हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये तोडायचे आणि त्यापैकी हायड्रोजनला लगेचच रूपांतरीत
करून त्याचे रुपांतर ओझोन मध्ये करायचे.
पाण्याच्या
इतर तिन्ही रूपात हा माझा फॉर्म्युला काम करत नाही. तर मी सांगत होतो की, तसे करण्यासाठी मी एक केमीकल बनवले आहे. ते
पाण्यावर मारल्यास त्याचे रूपांतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये होते आणि आणखी
दुसरे केमीकल वापरल्यास ओझोनमध्ये.
मला नक्की
खात्री आहे की ते सर्व आणि जेनिफर हे अमेयसह अॅनिस्टन ला मारण्यासाठीच गेले असतील.
मी तपास करतो की अॅनिस्टन नेमके कोणत्या देशात गेलेत, त्यावरून आपल्याला दुवा (कलू) मिळेल... मग आपण
तेथे जावून कमीत कमी त्या जलजीवांना नष्ट करू आणी तेथे लाल मातीच्या आधारे अमेयला
परत आणू... तुम्ही सर्व पटापट त्या गुहेतून ती रोपटी आणा. तोपर्यंत मी पुढचा प्लॅन
सांगतो"
फोन बंद
झाला.......
आता वेळ
दडवून चालणार नव्हते. ते सर्वजण जार्वार पर्वताच्या पायथ्याशी होते.
आणि अनेक
कामगार कोल तेथे खणत होते. शेवटी ती गुहेवजा जागा सापडली. ती सापड्ल्यावर खुप खोल
एका अंधार्या जागेत त्या बीया, रोपटे आहेत असे त्या फाईलमध्ये लिहिले होते. तसेच
इतर अनेक देशांतली बीया, रोपटे, झाडाच्या पानांचा भुगा (चुरा) असलेली ठीकाणे तेथे
असणार होता.
ते सर्वजण
गुहेतून आतमध्ये निघाले. बरेच पुढे गेल्यावर अंधारत दिसणारे ते दृश्य खूपच अद्भुत
होते.
अंधारात
ज्वाळांसारखी पाने दिसणारी ती झाडे. रांगेने त्या गुहेत अनेक तशी रोपटी आणी झाडे
होती.
ते पुढे
जावू लागले. त्यांचे जवळ सर्च लाईट होता.
ते पुढे
पुढे जावू लागले.
पुढे धोका
असू शकणार होता. पण सगलेजण आता एकाच ध्येयाने पछाडले होते. जलजीवांचा सर्वनाश!!
अंधारात
चालत असतांना पायांना अनेक बीया आणि भुगा लागत होत्या. त्याच त्या बीया असाव्यात.
त्या भरण्यासाठी त्यांनी मोठाल्या पिशव्या आणल्या होत्या. सोबत मदतीला आणलेले
कामगार आणि गडीमाणसं त्या बीया, भुगा आणि चुरा पिशवीत भरू लागलेत.
पूर्वी इथे
नक्की काहीतरी भयंकर घडले असावे. जे फक्त अमेयच्या पूर्वजालाच माहिती असावे. आणि
येथे तळ्यात नक्की जलजीवांचे वास्तव्य असावे, असे अॅनाला वाटून गेले.
थोडे दूरवर
समोर काही चमकणारे डोळे त्या सर्वांचा माग घेत पुढे आले.
अॅना
अचानक कींचाळली कारण, तीच्या
उजव्या बाजूलाच अग्नीने, ज्वालांनी बनलेला एक मानव डोळे मोठे करून बघत
होता. जमतील तेवढी रोपटी जमा करून सर्वांनी त्या गुहेतून बाहेर निघण्याचे ठरवले.
पण, ते ज्वाला-मानव त्यांचा रस्ता अडवून उभे होते.
तेवढ्यात जितीनने हातातले ज्वाला-रोपटे त्या विचित्र अग्नी-मानवावर मारले, तसा तो ओरडून दूर पळाला.
मग त्या
रोपट्यांचा धाक दाखवत दाखवत ते मानव पळून गेले. मग अनेक प्रकारचे विचित्र आवाज
करणारे प्राणी समोर येवू लागले. तेही रोपट्यांनी दूर पळाले. मग ते सर्वजण
गुहेबाहेर पळाले. कसे बसे ते गुहेच्या बाहेर आले. कदाचीत ते रोपट्यांचे रक्षक
असावेत? की आणखी
दुसरेच काही?
समोर
गुहेबाहेर येताच एक विचित्र दृश्य होते. आणखी सैतानी शक्ती त्यांचे समोर उभ्या
होत्या. म्हणजे तळ्याजवळ जलजीवांच्या रूपात रान मांजर, कोल्हे तेथे उभे होते. साप होते. पण पाणी रूपात. इकडे
गुहेतले अग्नी मानव आणि अग्नी-प्राणी सुद्धा गुहेबाहेर आले.
सगळेजण
स्तब्ध होवून हे दृश्य बघत होते.
म्हणजे
जल-प्राणी सुद्धा उदयास आले होते.
मागून
गुहेतून आलेले अग्नी-प्राणी आणि समोर अचानक उभे ठाकलेले जल-प्राणी.
कोल्हे, लांडगे, रानमांजरी गुरगुर करू लागले.