... सहाव्या दिवशी परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी दुपारी चार वाजता, किनार्‍यावर बेशुद्धावस्थेत केट सापडली. तीच्यावर उपचार केल्यानंतर कॅप्टन शी बोलतांना मी म्हणालो,

"
सध्या तर ती संभ्रमावस्थेत आहे. काही बोलत नाही आहे. पण आपण ऐकतो त्याप्रमाणे त्या बेटांवर जलजीवा वास्तव्य करून असतात. तेथे आलेल्या मानवांवर हल्ला करून ते त्यांना "मानव्-जलजीवा" बनवतात आणि आपला टोळीत सामील करतात. ते मरत नाहीत. त्यांना कसे काबूत आणायचे हे अजूनपर्यंत कुणालाही कळले नाही असे म्हणतात. ते स्वतःला पाणी, बर्फ, वाफ, ढग या सर्व रुपामध्ये पाहीजे तेव्हा रुपांतरीत करून घेतात. मी एका पुस्तकात हे वाचले आहे. मी त्यांना हे सांगितले सुद्धा होते. पण त्या चौघांनी ते हसण्यावर नेले....मला वाटते या सर्वांसोबत असेच काहीतरी घडले असले पाहीजे.
आणि आपण दोघांनी त्या रात्री बघीतलेले ते हिमनग? तो भास नसावा असे वाटते...."

कॅप्टन : "या सगळ्या कल्पना आहेत किंवा नाहीत हे नक्की सांगता येत नाही, असे मला वाटते. पण, काहीतरी गूढ आहे हे नक्की. तीला बरे वाटल्यावर आपल्याला कळेलच. "

केट बरी व्हायला आठवडा गेला.

तीने त्यानंतर आपला जो अनुभव आम्हाला सांगितला तो भयानक होता. कल्पनातीत होता."

यापुढील भाग फाईल नं. २ मध्ये. त्याचा पासवर्ड - डेव्हील्स स्क्वेअर- ९०९९२"

हे सर्व वाचतांना अ‍ॅनाच्या डोळ्यासमोर ती सतत फोटोत पहात असलेल्या आपल्या वडीलांचा चेहेरा तीला दिसला. तीला रडू आले. तीचा मोबाईल वाजू लागला.

अमोलः "अ‍ॅना. धीस ईज अमोल."

अ‍ॅना: "यस. अमोल. टेल मी."

अमोलः "अ‍ॅना, वि आर व्हेरी पॉझीटीव्ह टू फाइंड अमेया. बट वी रिक्वेस्ट यू टु कम डाऊन टू इंडिया. वी ऑल वांट टू मीट यू. आम्हाला तूला भेटायचे आहे. तू इकडे ये म्हणजे तुझी दोन्ही दु:खे हलकी होतील.

आपण सर्व मिळून अमेय ला शोधूयात. "

अ‍ॅना: "......"

अमोलः "वी नो. यु आर अपसेट. इफ यु टेक सम टाईम ऑफ अ‍ॅण्ड कॉल अस बॅक अ‍ॅण्ड लेट अस नो युर डिसिजन. सुटी घे आणि भारतात निघून ये. आम्ही तुझी वाट बघत आहोत."

अ‍ॅना: "थॅन्क्स....मे बी लॅटर आय वील टेल यू......आईची शेवटची इछा टिच आहे...अमेया शी लग्ना..... मी येईन... ठरवून सांगते...बाय!!"

आकाशात दोन डोळे अ‍ॅनाच्या खिडकी कडे पाहून हसत होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता आंघोळ करायचे ठरवून अ‍ॅना बाथ-टब मध्ये गेली.

अंगावरचे सगळे कपडे काढून ती टब मध्ये बसली. डोक्यात अमेयचाच विचार सुरू होता. गरम पाण्याचा शॉवर हातात धरून ती सगळी कडे फिरवत होती....

मग तीने शॉवर तोंडासमोर धरला. शॉवरचे सगळे थेंब तोंडावर आदळत होते.

शून्य मनाने ती शॉवर बाथ घेत होती. तीने डोळे बंद केले होते.

.......
शॉवर मधले थेंब हळू हळू एकत्र यायला लागले.
एकत्र येवून येवून मोठमोठे थेंब व्हायला लागले. ते थेंब एकत्र येवून त्या थेंबातून चेहेरा तयार व्हायला लागला. तीने अचानक डोळे उघडले. समोर पाणी सदृश्य अमेयचा चेहेरा होता. तीला वाटले भास असेल. तीने पुन्हा डोळे बंद केले.

समोर अधांतरी हवेत पाण्यापासून अमेय तयार होत होता, तो तयार होवून बाथरूमच्या भिंतीवरून ओघळत ओघळत वरच्या दिशेला गेला आणि पाणी-सदृश्य अमेय आता बाथरूमच्या वरच्या भागाला चिटकलेला होता.

तीने डोळे उघडताच त्याला छतावर पाहून ती किंचाळली. तो अमेय उर्फ जलजीवा तीच्या कडे पाहून गूढ हसत होता. अमेय? आता? इथे? जलजीवा? बाबांनी लिहिलेले ते वाचल्यामुळे आपल्याला भास तर होत नसेल?

अचानक तीच्या डोक्यात प्रकाश पडला. अमेय मला सांगायचा ती स्त्री.... त्याला भेटली होती. ते जंगल. ती अचानक गायब झालेली स्त्री. बाबांनी लिहिल्याप्रमाणे जहाजावर हल्ला करणारे ते जलजीवा... त्यातही एक स्त्री असायची....

आणि हा समोर? कोण? अमेय? तो तर भारतात आहे. येथे कशाला येईल तो?

ती किंचाळताच तो अमेय पूर्ण माणूस बनू लागला, त्याने तीच्या अंगावर उडी मारली. ती पटकन बाजूला झाली.

तो टब मध्ये पडला. पुन्हा पाणी झाला. त्यामुळे तीला दिसला नाही.

बराच वेळ ती स्तंभित होवून हा सगळा प्रकार बघत होती. त्यानंतर बराच वेळ बाथरूम मध्ये कुणीही नव्हतं.

भास झाला असे समजून ती तशीच बाथरुम च्या बाहेर गेली. तीने कपडे घातले.

ती फारच भेदरलेली होती. पटापट तयार होवून तीने एक ऑमलेट बनवले. ते खाल्ले. कालपासून काही खाल्ले नव्हते.

जेफ ला तीने घडलेला प्रसंग सांगितला. जेफ हसू लागला.

त्याने सल्ला दिला, "हे बघ अ‍ॅना. अमोल म्हणतो त्याप्रमाणे तू इंडीयात का निघून जात नाहीस? तुझ्या वडीलांनी जरी तसे लिहिले आहे तरी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते सगळे ऐकीव माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे तो तुला भासच झाला असेल. तु इंडियात जा. त्याच्या घरच्यांना भेट. आणि अमेयने तूला सांगितलेल्या त्या स्त्री बद्दल म्हणशील, तर अमेय ने तुझी गम्मत सुद्धा केली असूऊ शकेल गं. डोंन्ट वरी! "

अ‍ॅना: "ठीक आहे जेफ. तेच बरे राहील. मी आज सुट्टी साठी अर्ज करते. आणि जाते निघून इंडीयात. पण माझ्या वडीलांचे लॅपटॉप आणि सर्व सिडीज? त्या सुद्धा सोबत घेवून जाव्या लागणार...."

जेफः"इट्स योर चॉइस. डु अ‍ॅज यू फिल राईट. चल बाय. काही मदत लागली तर सांग!"
जेफ निघून गेला. विचारात असतांनाच अ‍ॅना ट्युब मध्ये चढली.

तीने सगळी परिस्थीती समजावून सांगितल्यानंतर काही दिवसांची सुट्टी तीला मिळाली. तीने त्याच दिवशी रात्रीची फ्लाईट बुक केली.

अमोलला तीने भारतात येत असल्याचे कळवले.

संध्याकाळी घरात शिरताच घरात सगळीकडे पाणीच पाणी होते. ते तीने काठी असलेल्या स्पंजने पुसले. अगदी सगळी कडेच पाणी होते. कपाटावर, टेबलवर....

ती जायची तयारी करू लागली. दोन मोठ्या लगेज बॅग्ज आणि स्वतः जवळ विमानात ठेवायच्या दोन छोट्या बॅग्ज अशा चार बॅग्ज तीने घेतल्या. जवळच्या एका बॅग मध्ये लॅपटॉप आणि सर्व सिडीज चा बॉक्स.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel