समर्थ रामदास स्वामी‎
समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.
मनाचे श्लोक

मनाचे श्लोक ह्या आपल्या रचनेत स्वामी रामदास ह्यांनी मनावर कसे आणि कोणते संस्कार करावेत हे स्पष्ट केले आहे. काही लोक ह्याला अध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहतात तर काही लोक तत्वज्ञानीक दृष्टीकोनातून वाचतात.

दासबोध
Featured

दासबोध समर्थ रामदासांनी लिहिलेला ग्रंथ आहे. दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी,त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींकरवी लिहविला. रायगड जिल्ह्यातील शिवथरची घळ या घटनेची साक्ष देत आजही अत्यंत निबीड अरण्यात विसावलेली आहे. दासबोध हा ग्रंथ एकुण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांना,साधकांना,निस्पृहांना,विरक्तांना,सर्व सामान्यांना,बालकांना,प्रौढांना,जराजर्जरांना,सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना,मानवी मनाला उपदेश केलला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात. समर्थ रामदास स्वामींनी दसबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...

करुणाष्टके

करुणाष्टके म्हणजे करुणाघन परमेश्वरास प्रेमभराने आळविणारी कविता. आपल्या दुर्गुणाची आठवण होऊन अनुतापयुक्त जे छंदोबद्ध उद्गार मुखावाटे बाहेर पडतात, ती करुणाष्टके होत. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या या करुणाष्टकांत करुणरस ओतप्रेत भरलेला आहे. ही करुणाष्टके म्हणताना बाह्यसृष्टि विसरुन जाऊन अर्थाबरोबर मनाने रमावे.